Nigdi : सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेल्या सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यमुनानगर, निगडी येथील एस.पी.एम विद्यालयात हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला एस.पी.एम. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लीना वर्तक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी अर्चना डबीर यांनी वर्षभरातील वाचन कट्ट्याचा प्रवास सांगितला. भाग्यश्री पाठक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नंतर मुलांनी त्यांच्या आवडत्या गोष्टींचे वाचन केले. उपस्थित पालकांनी वाचन कट्ट्यामुळे मुलांमध्ये झालेला वाचनातील बदल आपल्या मनोगतामधून सांगितला. वाचन कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पाहुण्यांच्या हस्ते मुलांना बक्षीस म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.

माकडाची गोष्ट सांगून पाहुण्यांनी उपस्थितांना वाचनाचे महत्व सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते या वाचन कट्ट्याचे सोहन वाचन कट्टा असे नामकरण करण्यात आले. दर महिन्याला वेगवेगळे विषय घेऊन वाचन कट्टा आयोजित केला जातो.

यापुढे एस.पी.एम.विद्यालयामध्ये दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी सोहन वाचन कट्टा होणार असून पुढील वाचन कट्टा 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे. सूत्रसंचालन अमृता देशपांडे यांनी केले. प्रणाली महाशब्दे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहल भाटे, भाग्यश्री गावडे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.