Baramati news : बारामती तालुक्यातील दुर्दैवी घटना, ‘या’ कारणामुळे दोघांना गमवावा लागला जीव

एमपीसी न्यूज : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथून एक दुःखद घटना उघडकिस आली आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू (Unfortunate incident in Baramati taluka) झाला आहे.

विषारी ताडीचे प्राशन केल्याने दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू लक्ष्मण गायकवाड (वय 35) आणि हनुमंता मारुती गायकवाड (वय 40) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

Pune : ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, बालगंधर्व चौकात बॅनर लावले कुणी?

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, माळेगाव बुद्रुक येथील चंदन नगर परिसरात भटक्या समाजाची मोठी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीत राहणाऱ्या पाच जणांनी ताडी पिली होती. ताडी पिल्यानंतर काही वेळातच पाचही जणांना अस्वस्थ वाटू लागले.

अत्यवस्थ झाल्याने यातील राजू गायकवाड या दोघांचा मृत्यू झाला. तर भैरू चिनाप्पा गायकवाड भीमा चिनाप्पा गायकवाड आणि भीमा क्लप्पा भोसले या तिघांवर बारामती येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबातील दोन करत्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने चंदनगर परिसरात मोठा आक्रोश पहावयास मिळाला.

या घटनेत प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एका संस्थेत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.