Pune News : ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, बालगंधर्व चौकात बॅनर लावले कुणी?

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief minister eknath shinde) आणि 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडली. ठाकरे गट (Thackeray gat) आणि शिंदे गट (Shinde Gat) अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. आणि त्यानंतर या दोन्ही गटातील वाद आता संपण्याचं नाव घेत नाही. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगी हे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला केल्याने पुन्हा एकदा या दोन्ही गटात वाद रंगला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. 

बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून पुण्यात आता बॅनरबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आले आहे. शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार समोर आला आहे. बालगंधर्व चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा अशा शब्दात लिहून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
राज्यातील उद्योगधंदे बाहेर जाण्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा आरोप या बॅनर द्वारे करण्यात आला आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आतापर्यंत कुठले उद्योगधंदे/प्रकल्प राज्याबाहेर गेले याची यादी देखील मांडण्यात आली आहे. या बॅनर नंतर आता आणखी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.