Pune News : पत्नी असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढले

एमपीसी न्यूज : घरात पत्नी असतानाही अनेक तरुणांशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि घटस्फोट झालेला नसतानाही दुसऱ्या महिला पोलीस शिपायला लग्नाची मागणी घालणाऱ्या पोलीस शिपायाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हेमंत नथू रोकडे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तो नेमणूक केला होता.

त्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 2018 मध्ये हेमंत रोकडे याचा विवाह झाला होता. विवाह नंतरही त्यांनी वेगवेगळ्या मुली सोबत प्रेम संबंध ठेवले. व्हाट्सअप वर चॅटिंग करणे, पत्नीला ठार मारण्याची धमकी देणे असे वेगवेगळे प्रकारही त्यांनी या काळात केले. याशिवाय विवाहित असताना आणि घटस्फोट झालेला नसतानाही पोलीस मुख्यालय येथील एका महिला पोलीस शिपाई सोबत प्रेम संबंध ठेवले. तसेच तिला लग्नाची मागणी ही घातली होती.

बारामती तालुक्यातील दुर्दैवी घटना, ‘या’ कारणामुळे दोघांना गमवावा लागला जीव

दरम्यान हेमंत रोकडे यांच्याविरुद्ध जानेवारी 2021 मध्ये कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तो फक्त एकदा हजर राहिला. त्यानंतर त्याने चौकशीत सहकार्य केलेच नाही. अखेरीस एकतर्फी चौकशी झाल्यानंतर हेमंत रोकडे याने पोलीस दलाची प्रतिमा मधील केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. आणि त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी हे आदेश दिलेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.