Vadgaon : मावळात आज कोरोनाचे 19 नवे रुग्ण; एकूण रूग्णांची संख्या 255

19 new corona patients in Maval today; Total number of patients 255

वडगाव मावळ – मावळ तालुक्यात आज, मंगळवारी तळेगाव येथील 06, टाकवे खुर्द येथील 03, कामशेत व सोमाटणे येथील प्रत्येकी 02; तर वडगाव, लोणावळा, भाजे, सुदुंबरे, सुदवडी व वराळे येथील प्रत्येकी 01 अशा एकूण 19 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीचशे पार म्हणजे 255 झाली आहे. त्यात शहरी भागातील 93, तर ग्रामीण भागातील 162 जणांचा समावेश आहे.

तळेगाव दाभाडे येथील बुधवार पेठमधील 58 वर्षीय महिला, तुकारामनगरमधील 58 वर्षीय व्यक्ती, प्रतीकनगरमधील 26 वर्षीय व्यक्ती, म्हाळसकरवाडी येथील 29 वर्षीय व्यक्ती, तर मावळ लॅन्डमधील 49 वर्षीय व्यक्ती व मनोहरनगर मधील 29 वर्षीय व्यक्ती अशा 6 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील 06 नवीन रूग्णांची भर पडल्याने तेथील रूग्ण संख्या 66 झाली आहे. लोणावळा येथील 17, तर वडगाव येथील रूग्ण संख्या 07 झाली आहे. आतापर्यंत 09 जणांचा मृत्यू झाला असून 87 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

सक्रिय 159 रूग्णांपैकी 76 लक्षणे असलेले तर 83 लक्षणे नसलेले अर्थात बाधित रूग्णांच्या संपर्कातील आहेत. लक्षणे असलेल्या 76पैकी 61 जणांमध्ये सौम्य तर 13 जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. दोन जण अत्यवस्थ आहेत.

119 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून 40 जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 66 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर 23जण उपचार घेत आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.