Vadgaon Budruk : खड्ड्यामधे अडकलेल्या दोन शेळ्या व एक बकरीची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सिंहगड अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एका सेप्टीक टॅंकमध्ये पडलेल्या दोन शेळ्या व एक बकरीची (Vadgaon Budruk) सुखरुप सुटका केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, फायरमन संजू चव्हाण म्हणाले, की पुणे- बंगळुरू हायवेवरील वडगाव ब्रिजजवळ एका खुल्या प्लॉटमधील सेप्टीक टॅंकमध्ये दोन शेळ्या व एक बकरी अडकल्याची वर्दी आज दुपारी 12.30 वा ते 12.45 वाजेच्या दरम्यान वर्दी मिळाली. त्यामुळे सिंहगड अग्निशमन केंद्राचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. एका शिडीच्या मदतीने एक फायरमन टाकीत गेला व व त्याने एक एक करून सर्व शेळ्या व बकऱ्यांना वर आणून इतर फायरमन यांना दिल्या. तो सेप्टीक टँक अंदाजे सात ते आठ फूट खोल होता.

या बचाव कार्यात सिंहगड अग्निशमन केंद्राचे तांडेल पांडुरंग तांबे, तर वाहनचालक संतोष चौरे व जवान संजू चव्हाण, बाबू कोकरे, श्रीनाथ जाधव यांनी सहभाग घेतला.

Khed : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग तातडीने करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

फायरमन चव्हाण पुढे म्हणाले, की त्या शेळ्या व बकरी स्थानिक मेंढवा शिवाजी कोकरे यांच्या होत्या. कोकरे यांनी सांगितले की त्यांनी तिथे दुपारी त्यांच्या शेळ्या व बकऱ्या करण्यासाठी आणल्या होत्या. त्यानंतर पुढे शेळ्या व बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले. रात्री घरी गेल्यावर त्यांनी सर्व शेळ्या व बकऱ्यांची मोजणी केली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की दोन शेळ्या व एक बकरी (Vadgaon Budruk) कमी आहे.

त्यांनी काल सकाळी शेळ्या व बकऱ्या चरण्यासाठी नेलेल्या सर्व ठिकाणी शोधल्या. दुपारी ते पुणे बंगळुरू हायवेवरील वडगाव ब्रिजजवळील खुल्या प्लॉटमध्ये आले व बेपत्ता शेळ्या व बकरीला शोधू लागले. त्यांना गवताजवळून शेळ्या व बकरीचा आवाज ऐकू आला. ते जवळ गेले व त्यांनी पाहिले की गावामध्ये एक खड्डा आहे. त्या खड्ड्यातून त्यांना आवाज आला. त्यांनी आजूबाजूचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की ती सेप्टीक टाकी असून त्यामध्ये त्यांच्या शेळ्या व बकरी गवत खात असताना अनावधानाने पडून अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्या अडकलेल्या शेळ्या व बकरी बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला कळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.