Vadgaon Maval : आबाजी बाबूराव वायकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील प्रगतिशील शेतकरी आबाजी बाबूराव वायकर (वय 93) यांचे बुधवारी, (दि. 23) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.

आबाजी वायकर हे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर व प्रगतीशील शेतकरी खंडूजी वायकर यांचे वडील तसेच हॉटेल व्यावसायिक अतुल वायकर यांचे आजोबा होत. वायकर यांच्यावर वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.