BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : पं. शौनक अभिषेकी यांची शनिवारी रंगणार संगीत मैफल

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- श्रीरंग कलानिकेतनतर्फे कै. सुनील साने स्मृती वार्षिक संगीत महोत्सवांतर्गत सुप्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीचे शनिवारी (दि. 26) आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे येथील ईशा हॉटेलमध्ये सकाळी 10 ते दीड वाजेपर्यंत ही मैफल रंगणार आहे. यावेळी पं. शौनक अभिषेकी यांना संवादिनीवर उदय कुलकर्णी तर तबल्यावर सुभाष कामत साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या संगीत मैफिलीचा आनंद जास्तीतजास्त रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.