Vadgaon News : नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने सहारा वृध्दाश्रमासाठी आर्थिक सहाय्य

एमपीसीन्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थदादा पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने सहारा वृध्दाश्रमास पक्के शौचालय उभारण्यासाठी 17 हजार रूपयांची मदत करण्यात आली.

आंदर मावळ येथील कुसवली या गावात अनाथ निराधारांसाठी सहारा वृध्दाश्रम उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पक्के शौचालय उभारण्याचे काम बाकी होते. त्यासाठी तळेगाव नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष भेगडे यांनीपुढाकार घेतला.

पार्थदादा पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 14  हजार रूपयांचा निधी याकामासाठी वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केला.

सामाजिक बांधिलकी जपत भेगडे परिवाराने आपले नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या मदतीबद्दल वृध्दाश्रमाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संतोष भेगडे, श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राहुल पारगे, संचालक अनिल पवार, अरविंद गद्रे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.