Vijayadashami : राष्ट्र सेविका समितीची विकास यात्रा

एमपीसी न्यूज –  राष्ट्र सेविका समितीची विकास यात्रासद्य स्थितीत जगभरात रोज एकातरी नवीन संघटनेचा उगम होतांना (Vijayadashami)  दिसतो. अशा संघटना कधी उगम पावतात आणि कधी संपतात हे कळतही नाही. काही मोजक्या संस्था संघटनांचे कार्य मात्र अव्याहतपणे अनेक वर्ष सुरू असते. आज विजयादशमी आहे. अव्याहतपणे अनेक संकटांचा सामना करत वाढत असलेल्या दोन अखिल भारतीय संघटनांचा आज स्थापना दिन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिति या त्या दोन संघटना. त्यानिमित्त समिती विषयक लेख.

समाज मनातील हिंदू भाव अस्मिता जागृत करून समाज संघटित करणेचा संकल्प करीत या संघटना कार्य करीत आहेत. आज संघाचा 98 वा तर समितीचा 87 वा स्थापना दिन. एका संघटनेचे काम फक्त पुरुषांसाठी तर दुसरे फक्त महिलांसाठी. आज या दोन ही संघटनांचा वटवृक्ष त्या संघटनेच्या कार्यपद्धती व निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे दिवसेदिवस वाढतानाच दिसतोय.

भारताला परम वैभवापर्यंत नेण्यासाठी मनामनात राष्ट्रभाव जागरण महत्वाचे आहे. संस्कारक्षम पिढी घडविणेच्या कामात महिलांची सहभागीता ही तितकीच महत्वाची हे ओळखून 1936 साली वर्धा येथे वं. मावशी उर्फ लक्ष्मी बाई केळकर यांनी राष्ट्र सेविका समितिची स्थापना केली. प. पू. डॉ. हेडगेवार यांचे सोबत झालेल्या चर्चेतून, विचार मंथनातून समितीची कार्यपद्धती ठरवली गेली.

तेजस्वी हिंदू राष्ट्र निर्माण कार्यात संघ आणि समिति कायम एकाच ध्येयाने परंतु स्वतंत्रपणे, समांतरपणे मार्गक्रमण करेल हे समिति स्थापनेवेळीच निश्चित झाले. त्या प्रमाणेच स्वतंत्रपणे आजही समितिकार्य सुरू आहे.दैनंदिन/ साप्ताहिक शाखा हा मुळ गाभा ठेवून विदर्भातील वर्ध्यात रोवलेल्या समितिरूपी बीजाला हळूहळू सातारा, भंडारा, पुणे, मुंबईअशा अनेक पालव्या फुटू लागल्या. पुणे येथे अशाच प्रकारे वं. ताई आपटे यांनी सुरू केलेले काम समिति कार्यात विलीन झाले आणि समितीचे रोपटे अनेक फांद्यानी बहरू लागले.

Maharashtra : सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा

महाराष्ट्राबाहेरही उज्जैन, इंदोर, जबलपूर, ग्वाल्हेर, रायपूर, विलासपूर, भोपाळ, ठिकाणी समिति कार्याने जोर घेतला आणि बघता बघता गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश बरोबरच भारतभर समिति कार्याचे जाळे विणले गेले.संघटनात्मक कार्यपद्धती मध्ये ही कालानुरूप बदल होत गेले. दृष्ट संहारिणी शक्तीचे प्रतीक असलेली अष्टभुजा आराध्य देवतेच्या रूपात (Vijayadashami) समोर आली. विशिष्ट स्थानी, विशिष्ट वेळी श्रद्धापूर्वक केलेल्या प्रार्थनेतून शक्तिस्त्रोत निर्माण होतो या विचारातून वेगळी प्रार्थना तयार केली गेली.

मराठीतून केलेली पहिली प्रार्थना विविध प्रांतातील कार्य वृद्धीमूळे देववाणी संस्कृत भाषेत रूपांतरित केली गेली. भारताचा गौरवशाली इतिहास, परंपरा, सण, उत्सव इ. जतन करण्यासाठी 5 उत्सव साजरे केले जाऊ लागले. मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व चे आदर्श जिजाऊ,राणी लक्ष्मी, अहिल्याबाई होळकर इ. रूपात प्रस्थापित केले गेले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, खेळ याबरोबरच शारिरीक, घोष, प्रशिक्षण वर्ग इ. योजना केली गेली. एकसूत्रता, एकता संघटनेत दिसावी म्हणून गणवेश ठरला.

संघटन कार्य वाढवीत समाज जागरण, प्रबोधन, करत असतानाच अनेक आंदोलनात ही समितिच्या सेविकांनी हिरीरीने सहभाग घेतला. 1942 चे चलेजाव,1952चे गोवध बंदी, 61 चे गोवामुक्ती, 1995 चे काश्मीर बचाव, 95 चे स्वदेशी आंदोलन, वंदे मातरम इ. अनेक आंदोलना बरोबरच 62 , 65 , 71 ,95 साली झालेल्या युद्ध प्रसंगी ही समिति सेविका पुढे होऊन काम करत होत्या. 1962 च्या चीन युद्धवेळी समितीच्या पहिल्या प्रचारिका सिंधुताई फाटक यांनी तत्कालीन सुरक्षा मंत्री यशवंतराव चव्हाण यांना प्रत्यक्ष(Vijayadashami)  भेटून 100 सेविका कोणत्याही कामासाठी येतील असे सांगून आश्वस्त केले होते.

झाशी राणीचे गौरवशाली कार्य स्मरण ठेवून बलिदान शताब्दी वर्षी 1958  साली नासिक येथे “राणी भवन” स्मारक उभारले गेले. 1974 साली राजमाता जिजाऊची 300 वी पुण्यतिथि सिंदखेडराजा व पाचाड येथे तर 94-95 साली अहिल्याबाई होळकर दविशताब्दी चौडी येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली.

300 ठिकाणी “स्वर जिजाऊ” जिजामाता वरील गाण्यांचे कार्यक्रम घेतले गेले. अनेक संमेलने, अभियाने राबवली गेली. 2001 ला जिजामाता 401 जयंती निमित्त अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डाक तिकिटाचे अनावरण (Vijayadashami) केले गेले. स्वामी विविकानंद सार्थशती, भगिनी निवेदिता स्मृति शताब्दी वर्ष, ही वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरे केले गेले.

“शिवभावेन जीवसेवा ” उक्ती प्रमाणे सेवा कार्यात ही पुढाकार घेऊन अनेक उद्योग मंदिरे, छात्रवास इ. सेवाकार्ये उभी राहिली. गुजरात मध्ये श्रमदानातून तलाव खोदणेच्या कामातही समितिच्या सेविका सहभागी होत्या. पुर, सुनामी, इ नैसर्गिक आपत्ति समयी धावून जात सर्वतोपरी मदत करण्यास सेविका तत्पर होत्या. पानशेत धरण फुटले तेव्हा समितीच्या सेविकांनी केलेले कार्य विसरता न येणारे आहे. गुजरात आपत्ति वेळी दत्तक घेतलेल्या “मयापूर” गावास ‘निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

सीमावर्ती भागातील, आतंकवाद पीडित बालिकांचे पुनर्वसन, घरवापसी व्यवस्था केली जात आहे.दहशतवादाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी’शौर्य प्रशिक्षण वर्ग ‘ घेऊन खास प्रशिक्षण दिले जाते. पूर्वाचल भागातील मुलीसाठी आज ठिकठिकाणी वसतिगृह सुरू झालेत. समितिने महाराष्ट्रात राबविलेल्या “100 तास अखंड सूर्य नमस्कार अभियानाची नोंद “गीनीज वर्ल्ड बुकात झालेली आहे.

समितीचा 1936 साली प्रवाहित झालेला गंगा प्रवाह 87  वर्षा नंतर विस्तीर्ण पसरला आहे. या प्रवाहाच्या विकासाची यात्रा मोजक्या शब्दांत मांडणे केवळ अवघडच. या प्रवाहाचा भाग होऊनच हा प्रवाह अधिक समजून घेता (Vijayadashami)  येईल.

 

लेखिका – सौ. अपर्णा महाशब्दे – पाटील
9823766644

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.