Pune : रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात 

    शरद पवार टिळक स्मारक मंदिरात तरुणांना मार्गदर्शन करणार 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या (Pune)  दिवशी विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे.राज्यात दसऱ्याच्या दिवशी आज अनेक राजकीय सभा होत आहे. त्याच दरम्यान तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल 800 किलो मीटरच्या युवा संघर्ष यात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सुरुवात झाली.

तर या यात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे टिळक स्मारक मंदिरात उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कामगार नेते बाबा आढाव,खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले वाडा,लाल महाल येथून पदयात्रेला सुरुवात होऊन पुढे आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती चौक, पेरू गेट, गांजवे चौक,नवी पेठ मार्गे टिळक स्मारक मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करणार (Pune)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.