World cup 2023 : अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय; 8 गडी राखून केला पराभव

एमपीसी न्यूज – चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात ( World cup 2023 ) अफगाणिस्तानने अफलातून खेळी करत मॉडर्न डे क्रिकेटचा नमुना सादर केला. पाकिस्तानने दिलेले 283 धावांचे लक्ष्य 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. क्रिकेटच्या इतिहासातला एकदिवसीय सामन्यातील अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुद्ध पाहिलाच विजय आहे. अफगाणिस्तान संघाचा हा विश्वचषकातला दुसरा विजय असून यापूर्वी त्याने गतविजेता इंग्लंडला धूळ चारली आहे. या विजयासह अफगाणिस्तान पॉईंट्स टेबल मध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

 

पाकिस्तानने दिलेले 283 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 गड्याच्या मोबदल्यात ( World cup 2023 ) सहज पार केले. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर 283 धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हे लक्ष्य गाठताना सावध व आक्रमक सुरुवात केली. रहमदुल्लाह गुरबाज 53 चेंडूत 65 धावा आणि इब्राहिम झादरान 87 धावा यांनी 130 धावांची सलामी दिली.
या भक्कम सुरुवातीनंतर अफगाणिस्तानने कोणतीही चूक केली नाही. आवश्यक धाव गती सांभाळून विकेट न गमावता स्कोर बोर्ड हलता ठेवला . त्यानंतर आलेल्या रहमत शाह याने संयमी फलंदाजी करताना 77 धावांची खेळी केली, तर हसमतुल्लाह शाहिदी याने 48 धावांचे योगदान देत अफगाणिस्तान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्यापूर्वी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला सामन्यात पाकिस्तान विजयी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या सर्व बाबींना छेद देत अफगाणिस्तानाने पाकिस्तानला 8 गडी राखून धूळ चारली. यापूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यामध्ये कधीही पराजित केले नव्हते. हा अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिलाच विजय ठरला आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही सलामीवीर अब्दुल्ला शफिक 53 धावा कर्णधार बाबर आजम 77 धावा यांनी अर्धशतकीय खेळी केली. मधल्या फळीत इफ्तिकार अहमद 40 आणि शादाब खान 40 यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानला 50 षटकांत 282 धावांचे लक्ष्य उभारण्यात यश आले.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले होते. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त निर्धाव चेंडू खेळले आहेत. यावेळी अफगाणिस्तान कडून नूर अहमद याने 3 बळी मिळवले. नवीन उल हक याने 2 गडी बाद केले. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना अपेक्षित गोलंदाजी करण्यात अपयश ( World cup 2023 ) आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.