Dighi News : अन त्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीला मंदिरासमोर सोडले बेवारस

एमपीसी न्यूज  – अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीला तिच्या पालकांनी  वडमुखवाडी येथील साई मंदिराच्या समोरील बाजूला बेवारस सोडून दिले. रडणाऱ्या मुलीचा (Dighi News) आवाज ऐकून अखेर पोलिसांनीच तिला आधार दिला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.22) सकाळी घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडमुखवाडी येथील साई मंदिरासमोर आलेल्या नागरिकांना गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक वर्षाची चिमुकली मोठमोठ्याने रडताना दिसली. तिच्याजवळ कुणीही नसल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. दिघी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. चिमुकलीला रुग्णालयात दाखल करून तिची प्रकृती तपासली. चिमुकलीचे प्रकृती उत्तम असल्याचे समजल्याने पोलिसांनाही हायसे वाटले.

Akurdi News : आकुर्डी येथे जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन आनंद मेळावा

याबाबत पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 317 नुसार अज्ञात पालकांच्या विरोधात फिर्याद दिली. (Dighi News) अज्ञात पालकांनी चिमुलीचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने तिला रस्त्यावर सोडून तिचा परित्याग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुणे बालकल्याण समितीला घटनेची माहिती देण्यात आली असून बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार चिमुकलीला दिघी येथील एका बालगृहात ठेवण्यात आले आहे. दिघी पोलीस पालकांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.