Sangavi News : जुनी सांगवी येथील रस्त्यांची दुरावस्था, अपघात होत असल्याने रस्ते दुरुस्तीची मनसेची मागणी

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी येथील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. (Sangavi News) येथे 3 ठिकाणी रस्ते खचल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे)या खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे म्हणाले की, ममतानगर ते शितोळेनगर हा 18 मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा जुनी सांगवीतील एका मुख्य रस्ता आहे. येथे मुळानगर मध्ये एका ठिकाणी रस्ता खचल्याने रात्री चालकास नं दिसल्याने अपघात घडलेला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

Dighi News : अन त्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीला मंदिरासमोर सोडले बेवारस

त्याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी जवळच पडलेल्या नारळाच्या बुंध्याचे तुकडे व बॅरिकेड लावून वाहनचालकांना अपघातापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच लवकरात लवकर खचलेले रस्ते दुरूस्त करण्याची मागणीही मनसेने केली आहे,

पवार नगर गल्ली नं.1, बालाजी लॅान्स फरसान कारखाना समोरील रस्ता खचलेला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थाप्त्य विभागाच्या अधिकार्यांना (Sangavi News) सांगितले असून त्यांच्यासोबत काल गुरुवारी त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. साळवे म्हणाले की अधिकाऱ्यांनी आज रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.स्थाप्त्य विभागाचे अधिकारी म्हणाले की ड्रेनेजचा चेंबर फुटल्याने रस्ता खचला आहे. ड्रेनेज विभाग ते चेंबर दुरुस्त करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.