Wakad Crime News : पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय पतीने तिच्या परस्पर दुसरे लग्न केले. तसेच विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केला. याबाबत पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2009 ते नऊ एप्रिल 2021 या कालावधीत घडला.

पती राहुल कुंडलिक सरवदे (वय 40, रा. काळेवाडी, मूळ रा. आंबळ शिराळ, ता. माढा, सोलापूर) आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी तिला शिवीगाळ आणि हाताने मारहाण करून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच आरोपी पतीने विवाहितेला काहीही न सांगता मूळगावी जाऊन अज्ञात महिलेशी लग्न केले. लग्नाचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवले. त्यानंतर त्या महिलेबाबत विवाहितेने पतीला विचारणा केली. त्यावेळी पतिने लग्न केले असल्याचे विवाहितेला सांगितले. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.