Maval Crime News : घरासमोर ठेवलेले 700 किलो स्टील चोरीला

एमपीसी न्यूज – घरासमोर ठेवलेल्या एक हजार 400 किलो स्टील पैकी सातशे किलो स्टील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. की घटना 15 मे रोजी सकाळी मावळ तालुक्यातील इंदुरी गावात उघडकीस आली.

गोविंद शंकर राठोड (वय 43, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या कामासाठी एक हजार 400 किलो स्टील आणले होते. हे स्टील त्यांनी त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ठेवले होते. 14 मे रोजी रात्री 10 ते 15 मे रोजी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यातील 21 हजार रुपये किमतीचे 700 किलो स्टील चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.