Pimpri Corona Update : शहरात आज 762 नवीन रुग्णांची नोंद, 1980 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा आलेख उतरणीस आला आहे. शहराच्या विविध भागातील 762 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 980 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 42 आणि महापालिका हद्दीबाहेरील 16 अशा 58 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 775 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 43 हजार 947 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 13 हजार 773 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 9 हजार 15 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 758 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 232 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 840 झाले आहेत. आज दिवसभरात 5 हजार 869 जणांचे लसीकरण झाले. तर, आजपर्यंत 4 लाख 70 हजार 942 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.