Maval Corona Update : दिवसभरात तालुक्यात 127 नवे रुग्ण तर 235 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.19) 127 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 415 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2197 आहे.

शहरी भागात 93 तर ग्रामीण भागात 34 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 75 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 23 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 20839 झाली आहे. तर दिवसभरात 235 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात जवन 6, नायगाव 5, कुसगाव बुद्रुक 4, बेबड ओहळ 3, सांगावडे 3, सोमाटणे 3, आंबी, गहूंजे, इंदोरी, खांड, कुसुर, मंगरूळ, पाचाणे, परंदवडी, शिरगाव व वेहेरगाव प्रत्येकी 1 असे एकूण 34 रुग्ण सापडले.

18227 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 6849, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3680 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1087 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 11616 रुग्ण तर ग्रामीण भागात 9223 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.47 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 787 लोणावळा नगरपरिषद मध्ये 203 वडगाव नगरपंचायत मध्ये 91 व ग्रामीण भागात 1025 असे एकूण 2197 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.