Pimpri News: पुन्हा लसींची बोंब! लसीअभावी उद्या लसीकरण बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुन्हा आज कोरोना प्रतिबंध लस मिळाली नाही. शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोमवार, मंगळवारी लस उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे सलग दोन दिवस लसीकरण ठप्प झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री कोविशिल्डचे 5 हजार आणि कोव्हॅक्सिनचे 2 हजार डोस उपलब्ध झाल्याने आज बुधवारी लसीकरण झाले. दिवसभरात 5 हजार 869 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर आज लशींचा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पुन्हा उद्या लसीकरण बंद राहणार आहे.

दरम्यान, 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, लसीची उपलब्धता कमी झाल्याने दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना लस मिळत नव्हती. अनेकांना लसीअभावी परत जावे लागत होते. त्यामुळे 18 वर्षांपुढील लसीकरण लांबविले. 18 वर्षांपुढील कोणालाही लस दिली जात नव्हती. केवळ 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा आणि पहिला डोस दिला जात होता. परंतु, मागील चार दिवसात तीन दिवस लस उपलब्ध झाली नाही. केवळ एकच दिवस लस उपलब्ध झाली. त्यामुळे लसींअभावी लसीकरण वारंवार बंद ठेवावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.