Wakad : सौर ऊर्जेच्या कच्च्या मालाची विक्री करण्याच्या बहाण्याने कंपनीची 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सौर उर्जा उपकरणे (Wakad ) बनवणाऱ्या कंपनीला कच्चा माल पुरविण्याच्या बहाण्याने कंपनीकडून 40 लाख 89 हजार 148 रुपये घेत कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 13 ते 19 मे या कालावधीत कस्पटे वस्ती, वाकड येथील सोलारईरा ग्रीन रीनियुबल्स प्रा ली येथे घडली.

इलेश शहा (वय 32), सुनील कांतीलाल शहा (वय 66) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पवन जालिंदर रणपिसे (वय 26, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत कच्च्या मालाची खरेदी करण्याचे काम एक महिला करतात. त्यांना आरोपींनी फोन करून सौर उर्जा उपकरणांच्या कच्च्या मालाची ते विक्री करतात, असे खोटे भासवले. फिर्यादी यांच्या कंपनीला आवश्यक असलेला माल पुरविण्यासाठी 40 लाख 89 हजार 148 रुपयांना व्यवहार ठरवला.

सर्व पैसे दिल्यानंतर माल पाठवून देतो असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार आरोपींनी कच्चा माल पुरविण्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीकडून 40 लाख 89 हजार 148 रुपये घेऊन माल न पाठवता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत (Wakad ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.