Wakad : वाकड परिसरात ज्वेलर्सची दोन दुकाने फोडून 41 किलो चांदी चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्पटे वस्ती आणि रहाटणी येथे दोन ज्वेलर्सची दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. दोन्ही दुकानातून एकूण 41 किलो वजनाचे चांदी आणि 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. हा प्रकार आज, गुरुवारी (दि. 16) सकाळी उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथे कनक ज्वेलर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 35 किलो चांदी आणि दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

चोरीचा दुसरा प्रकार रहाटणी मधील सिंहगड कॉलनी समोर घडला आहे. या ठिकाणी अंबिका ज्वेलर्स हे दुकान आहे. गुरुवारी पहाटे दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून सहा किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.