Wakad News : जवानांच्या सन्मानार्थ मॅरेथॉनमध्ये धावले विद्यार्थी     

एमपीसी न्यूज – वाकड  येथील आय.आय.ई.बी.एम, आणि फिटीस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने जवानांच्या सन्मानार्थ  इंडस बिझिनेस स्कूल, वाकड पुणे येथे रविवारी (दि.18) “विजय दिवस “ (Wakad News) च्या निमित्ताने सोल्जरॅथॉन- विजयरन  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये  150 हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे उदघाट्न हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. डॉ . विवेक मुगळीकर  यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी-आय.आय.ई.बी.एमचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ भारती कालिया,डॉ विशाल भोळे,समन्वयक बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन मोठ्या उस्साहात  पार पडली.

Chakan News : हॉटेल व्यावसायिकाचा घरातून साडे चार तोळे सोने चोरीला

या वेळी बोलताना प्रमुख  पाहुणे डॉ . विवेक मुगळीकर यांनी 1971 रोजी भारतीय सेनेने पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या आठवणींना उजाळा दिला तसेच (Wakad News) विजय दिवसानिमित्त पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांची आठवण करून दिली देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा जागृत होईल. असे मत वरिष्ठ पो. निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमामध्ये इंडस बिझनेस  स्कूल व इंडस चॅम्प्स स्कूल च्या विद्यार्थांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयेश त्रिपाठी,अपूर्व नागर,विवेक लिंबाळकर,हर्ष परमार,विवेक पटेल, तपन सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.