Chakan News : हॉटेल व्यावसायिकाचा घरातून साडे चार तोळे सोने चोरीला

एमपीसी न्यूज बंद घराची कडी तोडून हॉटेल व्यावसायिकाच्या (Chakan News) घरातून साडे चार तोळे सोने चोरून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) दुपारी ते शनिवारी (दि.17) सकाळी या कालावधी मध्ये निघोजे या गावात झाला आहे.

याप्रकऱणी चाकण पोलीस ठाण्यात संदीप शांताराम साकोरे (वय 32 रा.निघोजे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bhosari News : गाडीच्या नंबरप्लेटवर तरुणीचे नाव टाकणे पडले महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलुप लावून बंद असताना चोरट्यांनी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रेवेश केला, (Chakan News) त्यांनी घरातून 4 तोळे 5 ग्रॅम वजनाचे 67 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.