Bhosari News : गाडीच्या नंबरप्लेटवर तरुणीचे नाव टाकणे पडले महागात

एमपीसी न्यूज गाडीच्या नंबर प्लेटवर तरुणीचे नाव टाकणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलिसांनी (Bhosari News) त्याला अटक केली आहे. हा प्रकार भोसरी येथे शनिवारी (दि.17) घडला आहे.

तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून समीर राजू शिरसाठ (वय 19 रा. भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Chinchwad News : दुचाकीला कट मारला म्हणून पत्रकाराला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी हा नोव्हेंबर महिन्यापासून त्रास देत होता. फिर्यादी यांचा कॉलेजपासून तो पाठलाग करत असे, (Bhosari News) त्याने दुचाकीच्या नंबर प्लेटवर फिर्यादी व सनी असे लिहून फिर्यादी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यावरून भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.