Chinchwad News : दुचाकीला कट मारला म्हणून पत्रकाराला मारहाण

एमपीसी न्यूज दुचाकीला कट मारला म्हणून पाच जणांनी साप्ताहीक निर्भीड चे संपादक नंदकुमार नामदेव जोगदंड यांना मारहाण केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) रात्री चिंचवड स्टेशन चौक येथे घडला आहे.

Pimpri News : महिलेकडून खंडणी मागत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

याप्रकरणी पाच अज्ञातावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड हे त्यांच्या कार (एम.एच.14जी.डी.7764) मधून रुपीनगर निगडी येथे जात असताना पाच जण तीन दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या कारला दुचाकी आडवी लावली. (Chinchwad News) त्यांनी कार थांबवून दुचाकीला कट का मरला म्हणत फिर्यादीला हाताने व लाथेने मारहाण करत शिवीगाळ केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.