Pimpri News : महिलेकडून खंडणी मागत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज महिलेकडून व्हॉटस अपवरून 20 लाख (Pimpri News) रुपयांची खंडणी मागत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.17) सकाळी मोरवाडी येथे घडला आहे.

याप्रकऱणी 51 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 916302684338 या क्रमांक धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan News : चाकण मध्ये गुरांचा बाजार सुरु

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, महिला या मोरवाडी येथे त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर वरील क्रमांकावरून व्हॉटसअपवर एक मॅसेज आला ज्यामध्ये म्हटले होते की, मुझे तुम्हारी पुरी फॅमीली को मारने का कॉन्ट्रॅक्ट मिला है, जिसमे तुम्हारे दोनो बच्चे,तुम और तुम्हारा पती भी है, अगर फॅमीली लाईफ इम्पॉरटंट है तो कल रात तक 20 लाख अरेंज करना वरना मैं अपना काम कर दुंगा.(Pimpri News) पैसा या अपनी जान इसका जवाब आज रात तक चाहिये, असा धमकीवजा एसएमएस पाठवण्यात आला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.