Chakan News : चाकण मध्ये गुरांचा बाजार सुरु

एमपीसी न्यूज : लंपी आजाराचा संसर्ग कमी झाल्याने काही गुरांची खरेदी विक्री पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Chakan News) राज्यातील मोठा गुरांचा बाजार मानला जाणारा चाकण ( ता. खेड ) येथील गुरांच्या बाजाराला संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे शनिवार ( दि. 17 ) पासून हा बाजार पुन्हा सुरु करण्यात आला आहे. सध्या येथे सध्या केवळ म्हशींची खरेदी विक्री सुरु करण्यात आली आहे.

लम्पी आजाराचे संकट निर्माण झाल्याने  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील सुमारे तीन महिने जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले होते.  गुरांना होणारा  लंपी आजार संसर्गजन्य असल्याने याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले होते.  त्यामुळे 10 सप्टेंबर पासून म्हणजे सुमारे तीन महिने चाकण येथील गाय, बैल, म्हैस ,रेडे यांचा बाजार बंद होता. केवळ शेळ्या मेंढ्यांचा बाजार सुरु होता. (Chakan News) शनिवार पासून हा बाजार पुन्हा सुरु करण्यात आला असून केवळ म्हशींची खरेदी-विक्री येथे सुरु करण्यास परवागी मिळाल्याने म्हैस व शेळ्यांच्या बाजार सुरु करण्यात आला आहे. गाय-बैल या गुरांचा बाजार मात्र अद्याप बंदच असल्याने शेतकऱ्यांचा पशूसंवर्धनाचा जोड व्यवसाय अद्यापही अडचणीतच असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

Chakan News : चाकण मध्ये दोन दिवसीय इस्तेमा सुरू, हजारो मुस्लीम बांधवांची उपस्थिती

शनिवारी चाकण मार्केट मध्ये विक्रीसाठी आलेल्या 90 म्हशींपैकी 60 म्हशींची विक्री होऊन 25 हजार ते 40 हजार रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.