Chakan News : चाकण मध्ये दोन दिवसीय इस्तेमा सुरू, हजारो मुस्लीम बांधवांची उपस्थिती

एमपीसी न्यूज :  मुस्लिम बांधवांचा चाकण जवळील नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथे दोन दिवसीय इस्तेमा सुरू झाला असून यामध्ये हजारो भाविकांचा सहभाग आहे. (Chakan News) त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर इस्तेमासाठी जाणाऱ्यांची मोठी वर्दळ आहे. या इस्तेमामध्ये सहभागी होणाऱ्या हजारो मुस्लिम धर्मियांना धर्मगुरू मार्गदर्शन करत आहेत. शनिवारी (दि. 17) सकाळी सुरु झालेल्या या इस्तेमा रविवारी (दि.18) संध्याकाळी होणाऱ्या दुपारनंतर समारोप होणार आहे.

पुणे नाशिक महार्मागावर चाकण जवळील नाणेकरवाडी ( ता. खेड ) हद्दीतील सुमारे 100  एकर जमिनीवर मंडप तयार करण्यात आला आहे. निव्वळ मंडपच नाही तर यात तब्बल 1 लाख लोकांच्या मुक्कामाची, खाण्या-पिण्याची आरोग्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संखेने भाविक येत असतानाही या भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली असल्याचे कार्यक्रमस्थळी वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याठिकाणी पुणे जिल्ह्यातील 25 ते 30 हजाराहून अधिक भाविक हजेरी लावतील असे संयोजन समितीतील अस्लमभाई सिकीलकर यांनी सांगितले.

Chinchwad News : चिंचवड येथून विराट हिंदू जन गर्जना मोर्चाला सुरुवात

पुण्याहून जादा बसेसची व्यवस्था 
पीएमपीएमएल कडून 17 व 18 डिसेंबर 2022 रोजी कोंढवा खुर्द व चाकण येथून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.चाकण येथे मुस्लिम धर्मीयांचा इस्तेमाचा कार्यक्रम असून,(Chakan News) त्या अनुशंगाने हे जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.  सदर कार्यक्रमा करीता जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी कोंढवा खुर्द ते चाकण या मार्गावर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.