Chinchwad News : चिंचवड येथून विराट हिंदू जन गर्जना मोर्चाला सुरुवात

एमपीसी न्यूज – गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजा तर्फे चिंचवड (Chinchwad News) येथून विराट हिंदू जन गर्जना मोर्चेला आज (रविवारी) सकाळी सुरुवात झाली आहे. चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाला अभिवादन करून मोर्चा पुढे मार्ग क्रमण करण्यात आला आहे.

हा मोर्चा क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून होणार असूनमोर्चा महामार्गाने मार्गस्थ होत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.

Strawberry Farming : चिंबळी मध्ये सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरीची शेती

गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह (Chinchwad News) संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजा तर्फे पिंपरी-चिंचवड शहरात विराट हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.