Talegaon Dabhade : आगामी महिन्याभरात तळेगावमधील सुमारे दहा कोटींची कामे येणार पूर्णत्वास

एमपीसी न्यूज : मागील दोन वर्षाच्या काळात (Talegaon Dabhade) राज्य शासनामार्फत व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात भरघोस असा निधी महाविकास आघाडी व माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने आला. अनेक कामे सुरू असून त्यातील बहुतांश कामे पुढील महिन्याभरात पूर्णत्वास येतील. सुमारे 9 कोटी 91 लक्ष 30 हजार रुपयांची कामे पुढील महिन्याभरात पूर्णत्वास जाऊन नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये नक्कीच वाढ होईल, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे शहर विकासासाठी व भौतिक सोयी – सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी आला. वैशिष्ट्यपूर्ण योजना / ठोक तरतूद / नाविन्यपूर्ण योजना / नगरोत्थान / दलितोत्तर निधी या शिर्षकाखाली तळेगाव शहरात रस्ते, सभागृह, आर.सी.सी.पाईपलाईन, नगरपरिषद इमारत यांचे काम सुरु असून काही कामे पूर्णत्वासही गेली आहेत.पुढील महिन्याभराच्या काळातही तळेगाव शहरात खालील कामे पूर्णत्वास जाणार आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील •प्रभाग क्र. 1 मधील दाभाडे आळी ते राम मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 9 लक्ष 84 हजार.
•प्रभाग क्र. 04 वतननगरमधील गणेश मंदिरासमोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. – 22 लक्ष 57 हजार
•प्रभाग क्र. 04तुळजाभवानी मंदिरासमोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 21 लक्ष 12 हजार,
•प्रभाग क्र. 04 संत ज्ञानेश्वर शाळेच्या बाजूकडील व मागील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 13 लक्ष 89 हजार.
• सुभाष चौक ते डोळसनाथ मंदिर ते गणपती चौक (Talegaon Dabhade)पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – 73 लक्ष 97 हजार
• प्रभाग क्र 10 मधील मोकळ्या जागेत सभागृह बांधणे – 46 लक्ष 64 हजार
•उमंग सोसायटी ते टेलिफोन एक्चेंज रस्ता सुधारणा करणे. – 4 कोटी
• जिजामाता चौक ते घोरवाडी रेल्वे स्टेशन रस्ता करणे – 1 कोटी
• सोमाटणे फाटा ते तळेगाव पर्यंत रस्ता करणे. – 1 कोटी
•प्रभाग क्र. 10 मधील चावडी चौक ते योगेश भोर यांचे घरापर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – 90 लक्ष 39 हजार.
•प्रभाग क्र. 10 मधील संजय दाभाडे यांचे घर ते राम मंदिर ते मेहता चेंबरपर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – 30 लक्ष 26 हजार
•प्रभाग क्र. 7 खांडगे कॉलनी येथील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – 21 लक्ष 50 हजार.
•प्रभाग क्र. 7 मधील एकविरा सोसायटी ते म्हाडा कॉलनीपर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – 23 लक्ष 88 हजार.
•सिद्धार्थनगर येथील अंतर्गत रस्ते व गटार करणे – 46 लक्ष 21 हजार
•वतननगर येथील अंबिका पार्क मधील रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – 10 लक्ष 37 हजार.
•तळेगाव दाभाडे येथे मंडल अधिकारी कार्यालय बांधणे – 20 लक्ष 38 हजार
•तळेगाव दाभाडे येथे तलाठी अधिकारी कार्यालय बांधणे. – 20 लक्ष 38 हजार

अशी सुमारे 9 कोटी 91 लक्ष 30 हजार रुपयांची कामे पुढील महिन्याभरात पूर्णत्वास जाऊन नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये नक्कीच वाढ होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.