Wanwadi : ए बी टी सी तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद वानवडी येथे संपन्न

एमपीसी न्यूज : ए बी टी सी संस्थेकडून सौंदर्यशास्त्रासंबंधी आयोजित करण्यात (Wanwadi) आलेल्या परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थितांना सौंदर्यशास्त्राबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

 

असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी म्हणजेच ए बी टी सी तर्फे पुण्यातील वानवडीच्या महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात सौंदर्यशास्त्रातील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. सौंदर्य क्षेत्रातील सर्व घडामोडींबाबत व्यावसायिकांना जागरूक आणि शिक्षित करणे हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. परिषदेच्या समारोपात एबीटीसी संस्थेने सौंदर्यशास्त्रातील प्रशिक्षण (Wanwadi)  देऊन सक्षम केलेल्या मुलींनी सुरेख रंगभूषा आणि केशभूषेचे सादरीकरण केले.

 

या परिषदेत विविध सौंदर्य शाखेचे तज्ञ येऊन व्याख्यान, प्रात्यक्षिक या द्वारे मार्गदर्शन करतात. या राष्ट्रीय परिषदेत मनीष जानी (मुंबई), उमेश जगताप (कोल्हापूर) आणि कविता जावडवार (नांदेड) या सौंदर्यतज्ञांनी त्वचा, केस, केशभूषा आणि रंगभूषेवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Akurdi : आकुर्डीत सोमवारी आरोग्य शिबिर

 

यावेळी प्रमुख पाहुणे, मीनाक्षी शिंदे (माजी महापौर ठाणे) व नीता कलोरे (उद्योजिका) उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा कांतावाला, कार्याध्यक्षा स्मिता देव, सचिव अंजली जोशी, कोषाध्यक्ष तृप्ती शहा, कार्यक्रम नियोजक सुनंदा महाराणा, शिक्षण प्रभारी अजिता सुर्वे, रेवती राठी नम्रता गौड, एलजीबीटी कम्युनिटीचे जगदीश भोसले हे उपस्थित होते.

 

या राष्ट्रीय परिषदेस‌‌ महाराष्ट्रातून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी येथून सौंदर्य क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. याशिवाय चेन्नई, आंध्र, गुजरात या ठिकाणांहूनही  (Wanwadi)  अनेकांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.