Rahatani news: रहाटणी येथील शिवराज कॉलनी येथून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन मधून 4 दिवस पाणी गळती

एमपीसी न्यूज : रहाटणी येथील शिवराज कॉलनी 4 येथून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन मधून 4 दिवस पाणी गळती चालू असल्याची माहिती एका नागरिकाने दिली आहे.

त्याने सांगितले की तेथील पाण्याच्या पाईपलाईन मधून पाणी गळती 4 दिवस पूर्वी झाली होती. त्याविषयी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोनदा दुरुस्ती केली पण पुर्ण गळती थांबली नव्हती. त्यामुळे लेन 4 वरून काल रात्री वाहत होते.

Nandkishore Kapote : डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांची डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या संचालकपदी नियुक्ती

तेथील दुसरे रहिवासी म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून बऱ्याच हौसिंग सोसायट्यान्ना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांना पाण्याचे टँकर मागवण्यासाठी महिन्याला हजारो ते लाखो रुपये खर्च करावा लागतो. तर येथे लाखो लिटर पाणी गेल्या 4 दिवसात वाया गेले आहे. याविषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.