तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज- माहिती अधिकाराअंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी हे मागवलेली माहिती देण्यासाठी जाणून बूजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी केला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे स्नेहा निलेश माहुलकर यांनी त्यांची तेळगाव दाभाडे येथील 409, यशवंतनगर येथील जागेच्या बांधकामाचा तपशील, त्या बांधकाम दिल्या गेलेल्या परवानग्या आदींचा तपशील 11 ऑगस्ट रोजी मागवाला होता, तसा लेखी अर्ज देऊनही अद्याप कोणतीच माहिती नगरपरिषदेच्या प्रशासनाने दिली नाही. उलट उडवा-उडवीची उत्तरे देऊन माहिती देणे टाळले, असा आरोपही नाईक यांनी केला आहे.

Pimpri News: ‘पीएफ’ इमारतीसाठी सर्वोतोपरी मदतीस तत्पर – महेश लांडगे

याविषयी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक म्हणाले की, सदर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व तसेच जन माहिती अधिकारी हे माहिती दडवण्याचे काम करत आहेत का? जन माहिती अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांचे कुठल्या बांधकाम व्यवसायिकाचे आर्थिक धागेदोरे आहेत का व माहिती का दडवली आणि माहिती देण्यास टाळाटाळ का केली याचे उत्तर मुख्याधिकारी व तेथील जन माहिती अधिकारी यांनी द्यावे माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 हा कायदा येऊन अनेक वर्षे झाली पण सरकारी कर्मचारी असतील किंवा अन्य कोण असतील माहिती दडवण्याचा प्रयत्न हे अधिकारी वारंवार करत असतात किंवा आपला त्या आम्ही बघतो असेही सांगत असतात आज आम्ही मुख्याधिकारी यांची भेट घेण्याकरिता गेलो असता ते तिथे भेटले नाही ते रजेवर आहेत असे आम्हाला कळालं व तेथील जन माहिती अधिकारी सुद्धा रजेवर आहेत व ते येत्या सहा तारखेला ऑफिसला येणार आहेत असे आम्हाला उपमुख्य अधिकारी यांनी सांगितले.

म्हणजे तोपर्यंत भारताच्या मूळ मालकाने म्हणजे नागरिकांनी माहिती मागायची नाही का किंवा त्यांना माहिती मिळणार नाही का जन्म माहिती अधिकारी सुट्टीवर गेला असतास त्या जागेवर दुसरा अधिकारी नेमणे हे कायद्याचे बंधन आहे हे नगरपालिकेला कायद्याचे ज्ञान आहे का नाही? माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाने आता या मुख्याधिकारी व तसेच जन माहिती अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.