Talegaon Dabhade : पेपरचा पुरवठा न झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळांमध्ये होणाऱ्या परीक्षेला नगरपरिषदेकडून पेपरचा पुरवठा न झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. नगरपरिषद शिक्षण समिती प्रशासन व शाळेतील कामकाज करणारे लिपिक यांचा ताळमेळ न बसल्याने अशी वेळ ओढवली आहे.याबद्दल जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी संताप व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अख्यात्यारितमध्ये दोन माध्यमिक शाळा आहेत.या शाळेमधील विद्यार्थ्यांची परीक्षा दि. 22 ऑगस्ट रोजी होणार होती.परंतु नगरपरिषद शिक्षण समिती प्रशासन व शाळेतील कामकाज करणारे लिपिक यांचा ताळमेळ न झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे पेपर वेळेमध्ये मिळाले नाही.त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याची वेळ माध्यमिक शाळेच्या शिक्षकांवर आली व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.याबाबत पालक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पेपर न मिळाल्याने परीक्षा रद्द झाली आहे, अशी माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांना समजताच त्यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये येऊन संबंधित प्रशासन, शिक्षण समितीमधील पदाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या.अन्यथा आम्हाला आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा देखील दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.