Worldcup 2023 : जगजेत्या ब्रिटिशांची बांग्लादेशवर विजयी स्वारी; बांगलादेशचा 137 धावांनी पराभव

एमपीसी न्यूज – विश्वचषक जिंकण्याची मनीषा घेऊन भारतात (Worldcup 2023)आलेल्या गतविजेत्या इंग्लंडची बंग्लादेशावरील स्वारी विजयी ठरली असून, त्यांना वर्ल्डकपमधील पहिला विजय मिळाला आहे. सुरुवातीच्या सामन्यात पराभव झाल्याने निराश झालेल्या ब्रिटीशांचा आत्मविश्वास या विजयाने वाढला आहे.

धरमशाला येथे बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा(Worldcup 2023)निर्णय घेतला. इंग्लंडने बांगलादेशचे फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारत त्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या लढतीमध्ये डेविड मलानने केलेली तुफानी 140 धावांची शतकी खेळी तसेच बैरस्टो 51 आणि जो रूट 82 यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने बांगलादेश समोर 9 बाद 364 धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले. हे आव्हान पेलताना बांगलादेशचा संघ सर्वबाद 227 धावात गारद झाला. बांगलादेशाच्या वतीने लिटन दास 76 धावा आणि मुशफिकर रहीम 51 धावा यांनी अर्धशतकी झुंज दिली.

 

Honda : होन्डाच्या स्पोर्टी लूकच्या Honda Dio125 व SP160 बाजारात

तसेच मधल्या फळीत तोव्हीद ह्रिदय याने 39 धावांचे संयमी योगदान दिले. तत्पूर्वी बांगलादेशी गोलंदाज मेहदी हसन याने 4 गाडी बाद केले. तर शोरीफुल इस्लाम याने 3 बळी मिळविले. तथापि, बांगलादेशी गोलंदाजांना ब्रिटीश फलंदाजांना धावा करण्यापासून रोखता आले नाही.

 

प्रत्युत्तरात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज टॉप्ली याने 43 धावा देत 4 गाडी बाद केले. तर क्रिस वोक्स याने 2 गाडी बाद केले. त्यांच्या पुढे बांगलादेशी फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत बांगलादेश आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.