Pimpri Chinchwad : शहरातील नवरात्रोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन पद्धतीने परवानगी

एमपीसी न्यूज – सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळास (Pimpri Chinchwad) आवश्यक विविध प्रकारच्या परवानग्या, ना हकरत दाखले पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पोलीस विभाग यांच्या मार्फत ऑनलाईन देण्यात येणार आहेत. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाना दिल्या जाणारी विविध परवानग्या या वेळेत व सुलभ पद्धतीने देण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा मानस आहे. तरी सर्व मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणा-या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेले आहे.

ऑनलाईन परवानगी प्रक्रिया

महानगरपालिका व पोलिस आयुक्तालयाचे दोन वेगवेगळया संकेतस्थळांवर अनुक्रमे म.न.पा. व पोलिस स्टेशनला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत त्यानुसार दोन्हीही संकेतस्थळे एकमेकांशी Interlink (जोडलेली) आहेत. ऑनलाईन अर्ज व परवानगीही ऑनलाईनच मिळणार आहे.

अ) पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेकडे ऑनलाईन अर्ज व परवानगी.

1) महानगरपालिकेचे अधिकृत संकेत स्थळ www.pcmcindia.gov.in यावर नवरात्रोत्सव 2023 या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित मंडळास आपली नोंदणी करावी लागेल,

2) ही नोंदणी करताना अध्यक्षांचा मोबाईल क्रमांक हा पुढील ओटीपीसाठी वापरण्यात येणार आहे. (Pimpri Chinchwad)

3) मंडळाच्या अंतर्गत येणारे महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व निवडणूक प्रभाग यांची नोंद केल्यानंतर संबंधित अर्ज क्षेत्रिय कार्यालयास प्राप्त होईल,

4) संबंधित क्षेत्रीय कार्यालयमार्फत पुढील प्रक्रियेसाठी तो अर्ज स्थापत्य व अतिक्रमण विभाग यांना ऑनलाईन प्रक्रिया द्वारे पाठवण्यात येईल आहे. अतिक्रमण विभाग व स्थापत्य विभाग त्यांचे ना हरकत दाखले ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयालाकडे पाठवतील.

अर्ज प्रक्रियेमध्ये नोंद करण्यात आलेल्या मंडपाचे आकारमान यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असता कामा नये, स्थापत्य व अतिक्रमण विभाग यांनी दिलेल्या ना हरकत दाखल्यांना अनुसरून महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय मंडळांना ऑनलाईन परवानगी देईल, ही ऑनलाईन परवानगी अर्जदारांना त्यांच्या मोबाईल वर पाहता येईल.

5) महानगरपालिकेतर्फे दिली गेलेली ऑनलाईन परवानगी ही पोलिसांच्या लॉगिनला देखील पहावयास उपलब्ध असेल जेणेकरून मंडळांनी पोलीस परवानगीस अर्ज केल्यानंतर महानगरपालिकेची परवानगी मिळाली आहे की नाही याची खात्री पोलीस विभागाला ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

Worldcup 2023 : जगजेत्या ब्रिटिशांची बंगालवर विजयी स्वारी; बांगलादेशचा 137 धावांनी पराभव.

ब) पोलिस आयुक्त पिं.चिं.पोलिस आयुक्तालय यांच्याकडे ऑनलाईन अर्ज व परवानगी. (Pimpri Chinchwad)

1) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून नवरात्रोत्सव मंडळ याबाबत अर्ज करता येईल.

२) सदर अर्ज करताना मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे सचिव खजिनदार यांची सर्व माहिती फोटो सहित अर्ज प्रक्रियेमध्ये नोंद करावयाची आहे, मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ओटीपी पाठवून निश्चित केले जाणार आहेत.

3) मंडळाने संबंधित पोलीस ठाणे निवडायचे आहे, जेणेकरून फॉर्म हा संबंधित पोलीस स्टेशनच्या लॉगिनला जाईल व तिथूनच त्या परिसरातील वाहतूक विभागाला तो वर्ग केला जाईल, वाहतूक विभाग ऑनलाईन पद्धतीने आपला अभिप्राय नोंदवून संबंधित पोलीस ठाण्याला तो अर्ज ऑनलाईन पध्दतीने परत वर्ग करेल.

4) पोलिसांकडून दिली जाणारी ध्वनी क्षेपणाची परवानगी देखील ऑनलाइन स्वरूपामध्ये उपलब्ध असेल, मंडळांना वाहतूक विभागाची परवानगी लाऊड स्पीकरची परवानगी ही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,

5) परवानगीचा अर्ज करताना मंडळांना विसर्जन मिरवणुकीबाबत देखील माहिती अर्जामध्ये नोंदवावयाची आहे, संबंधित मिरवणुकीबाबत मंडळातर्फे जबाबदार पदाधिकाऱ्यांचे फोटो व पूर्ण माहिती उपलब्ध करून द्यायची आहे,

6) मंडळाचे देवीची मुर्ती विसर्जन हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कोणत्या घाटावर केले जाणार आहे याची नोंद करणे देखील आवश्यक आहे.

7) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाचे कार्यक्षेत्र हे पिंपरी चिंचवड शहर सोडून देखील आहे संबंधित नगरपरिषद नगरपालिका व ग्रामपंचायत यांना देखील सदर अर्ज ऑनलाईन प्रक्रिया द्वारे पाठवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.