Pimpri : विधानसभेची तयारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या रविवारी पुण्यात मुलाखती

तीन मतदारसंघातून 23 इच्छुक

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती
घेतल्या जात असून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या येत्या रविवारी (दि.28) मुलाखती होणार आहेत. तीन जागांसाठी राष्ट्रवादीमध्ये 23 जण इच्छुक आहेत.

पुण्यातील मार्केटयार्ड गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी पाच वाजता पक्षाकडे अर्ज केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विद्या चव्हाण, युवा नेते पार्थ पवार हे मुलाखती घेणार आहेत. इच्छुकांनी आपला बायो डाटा (संपूर्ण माहिती), मतदार संघातील कामाची फाईल, त्यांचे नियोजन आदी माहितासह मुलाखतीला वेळेवर हजर रहाण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.

हे आहेत इच्छुक

205 चिंचवड विधानसभा मतदारसंघातून

भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर पांडुरंग कलाटे, नाना काटे, प्रशांत शितोळे, सतीश दगडू दरेकर, राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर

206 पिंपरी विधानसभा मतदारसंघातून

माजी आमदार आण्णा बनसोडे, गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगा धेंडे, काळूराम पवार

207 भोसरी विधानसभा मतदारसंघातून

सात माजी आमदार विलास लांडे, दत्तात्रय (काका) साने, अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी हे इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे अर्ज केले असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.