Chinchwad : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पाच पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी गुरुवारी (दि. 25) काढले.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची 15 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे. त्यांना परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर केवळ दहा दिवसात त्यांची परिमंडळ दोन वरून मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा आणि प्रशासन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची मुख्यालयातून परिमंडळ दोनमध्ये बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची गुन्हे शाखा युनिट पाच येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पीसीबी शाखेचा कार्यभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त (कुठून कुठे)
# सुधीर हिरेमठ (परिमंडळ दोन ते मुख्यालय)
# विनायक ढाकणे (मुख्यालय ते परिमंडळ दोन)

सहाय्यक पोलीस आयुक्त (कुठून कुठे)
# श्रीकांत मोहिते (देहूरोड विभाग ते वाकड विभाग)
# संजय भाऊसाहेब नाईक पाटील (देहूरोड विभाग)

पोलीस निरीक्षक (कुठून कुठे)
# नारायण पवार (शिरगाव पोलीस चौकी ते नियंत्रण कक्ष)
# सुधाकर काटे (गुन्हे शाखा युनिट पाच – देहूरोड ते सायबर सेल)
# किशोर म्हसवड (हिंजवडी वाहतूक विभाग ते शिरगाव पोलीस चौकी)
# विवेक मुगळीकर (पीसीबी, गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा युनिट पाच – देहूरोड)
# सुनील दहिफळे (चाकण पोलीस स्टेशन – गुन्हे ते हिंजवडी वाहतूक विभाग)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.