Pimpri : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 62 रुपयांनी स्वस्त

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यामुळे देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62 रुपये 50 पैशानी कपात झाली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच हा नवा दर लागू झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील महिन्यात सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात १०० रुपयांची मोठी कपात केली होती. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी 62.50 रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यांत गॅसचे दर हे  163 रुपयांनी कमी झाले आहेत.

वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो. मात्र, ज्यांचा कोटा शिल्लक आहे अशा ग्राहकांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित गॅस सिलेंडरचा दर आता 574.50 रुपये इतका असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.