Pune : बुरुड समाजाच्या वतीने रविवारी समाज बांधवांचा सत्कार व वधुवर मेळावा

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा बुरूड समाज संघटनेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या समाजबांधवांचा सत्कार आणि वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 4 ) हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुक्त टिळक, डॉ. पी डी पाटील, अखिल महिला बुरुड समाज अध्यक्षा श्यामला सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बुरुड समाजातील डॉक्टर, पीएचडी, वकील, आर्किटेक्ट, इंजीनियर, फार्मसीस्ट तत्सम शिक्षण प्राप्त तसेच सरकारी, निमसरकारी, सहकार क्षेत्रात नैपुण्य मिळवुन समाजाचे नावलौकीक वाढविलेल्यां समाजबांधवांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच बुरुड समाजातील इच्छुक वधू वरांसाठी वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुणे जिल्हा बुरूड समाज संघटना अध्यक्ष विक्रम साळुंखे, खजिनदार डॉ. सचिन पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.