Talegaon Dabhade : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘एक संदेश देश के नाम’ घोषवाक्य स्पर्धा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगवा दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक संदेश देश के नाम’ घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव स्टेशन चौक, नगरपरिषद आणि मारुती मंदिर चौकात बूथची उभारणी करुन याठिकाणी संदेश बॉक्स ठेवण्यात येणार आहे. मराठी व हिंदी भाषेत केवळ दहा शब्दांत स्पर्धकांनी आपली घोषवाक्ये लिहावीत. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच राजकीय मंडळीचा अथवा अन्य बाबींचा यामध्ये अंतर्भाव नसावा. शालेय छोटा व मोठा गट, महाविदयालयीन तसेच खुला अशा चार गटात होणा-या या स्पर्धेचा रविवारी (दि.१८) दुपारी तीन वाजता नाना नानी पार्क येथे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख रो. नितीन फाकटकर यांनी दिली.

या स्पर्धेत जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रो. शंकर जाधव आणि इनरव्हील अध्यक्ष वैशाली जामखेडकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.