Pune : राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे मराठी लावणी नृत्याची राज्यस्तरीय स्पर्धा

10 फेब्रुवारी रोजी प्राथमिक फेरी, 14 फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे मराठी लावणी नृत्याची राज्यस्तरीय सोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक फेरी होणार असून 14 फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून ११ लावणी सम्राज्ञी, नृत्यांगनांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, पुणे शहराध्यक्ष प्रमोद रणनवरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

युवा गट आणि खुला गट अशा विभागात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकास सोन्याची नथ,पैठणी आणि रोख 25 हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. खुल्या गटातील द्वितीय क्रमांकास 20 हजार आणि पैठणी ,तृतीय क्रमांकास 15 हजार आणि पैठणी असे पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन स्पर्धकास उत्तेजनार्थ पारितोषिक 3 हजार आणि पैठणी असे आहे . युवा गटातील द्वितीय क्रमांकास 15 हजार आणि पैठणी, तृतीय क्रमांकास 10 हजार आणि पैठणी असे पारितोषिक देण्यात येणार आहे. युवा गटात दोन स्पर्धकास उत्तेजनार्थ पारितोषिक ३ हजार आणि पैठणी असे आहे .

स्पर्धेची प्राथमिक फेरी निघोजकर हॉल(भिडे पुलाजवळ,नारायण पेठ) येथे 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या लावणी स्पर्धेचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे, अभिनेत्री वैष्णवी पाटील यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे. लीला गांधी, गुलाबबाई संगमनेरकर, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, अप्सरा जळगावकर, बरखा जळगावकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, रेश्मा परितेकर, चैत्राली राजे, सुवर्णा काळे, अर्चना जावळेकर या लावणी सम्राज्ञी ,नृत्यांगनांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातून नांदेड, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, अकोला, अमरावती, येथून 150 च्या वर स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे .या स्पर्धेमध्ये मुलींबरोबर तृतीयपंथीयांना देखील इतर स्पर्धकांना बरोबर समान व्यासपीठ देण्याचे काम राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने केले आहे. 25 तृतीय पंथीयांचादेखील या स्पर्धेमध्ये सहभाग आहे,

अजूनही ज्या स्पर्धकां ना सहभागी व्हायचे असेल त्यांनी 8 फेब्रवारीपर्यंत 9921701501 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.