शिरूर येथील मंडल अधिका-याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करणार्‍या शिरूर येथील मंडल अधिकार्‍याला रंगेहात पकडले आहे. 

 

सतिश रामदास पंचरास (49, मंडल अधिकारी शिरूर) असे पकडलेल्या अधिका-याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी शिरूर येथील मंडल अधिकारी दरमहा दहा हजार रुपयांचा हप्ता मागत आहेत, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सतिश पंचरास याला दहा हजार रुपये स्वीकारताना शासकीय तलाठी निवास कक्षात आज सकाळी रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.