रेड झोनचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी काही दिवस कळ काढा – मनोहर पर्रिकर

एमपीसी न्यूज – बोपखेलचा पूल बांधण्यासाठी महापालिकेला दोन वर्षे लागतील, त्यासाठी काही टेंडर काढता येतील का या दृष्टीने  विचार करण्यास सुरुवात केली आहे. सीएमई परिसरात असलेला लष्कराचा दारूगोळा अत्याधुनिक पद्धतीने सुरक्षित कसा ठेवता येईल या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत, जर हा प्रश्न सुटला तर बोपखेलचा प्रश्न लगेच मार्गी लागेल. त्यामुळे रेड झोनचा प्रश्नही लगेच मार्गी लागेल पण त्यासाठी नागरिकांनी काही दिवस कळ काढावी. तसेच भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले तर तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करणे सोपे जाईल, असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. ते निगडीत आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बाबू नायर आदी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय लोकांमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण झाले. त्यांनी आजवर सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना राबवल्या. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सैनिकांसाठी लोकांना एकवेळ उपाशी राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा अनेकांनी त्याला प्रतिसाद देत एक वेळ उपवास ठेवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींना देशातील कोट्यावधी महिला चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गरज नसलेल्या नागरिकांना गॅससबसिडी सोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला भारतीयांनीही प्रतिसाद देत 1 कोटी तीस लाख लोकांनी सबसिडी सोडली. त्या महिलांपर्यंत मोफत गॅस पोहोचविण्याचे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.