पिंपरी-चिंचवडच्या मतदार यादी व मतदान केंद्राची माहिती सारथीवरही उपलब्ध

मतदान हेल्प डेस्कचीही उभारणी
 
एमपीसी न्यूज –  मतदान केवळ दोन दिवसावर आले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी सुमारे 11 लाख मतदार 1 हजार 608 मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. या मतदारांना त्यांचे केंद्र, मतदान बूथ कळावा यासाठी आज सकाळी सात पासून सारथीवर त्याची माहिती  उपलब्ध करण्यात आली आहे.  हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहेत.

सारथीच्या 8888006666 या टोलफ्री क्रमांकावर त्याची माहिती उपलब्ध आहे. तसेच महापालिकेमध्ये मतदार हेल्पडेस्क निर्माण करण्यात आलेला असून त्यासाठी इलेक्शन हेल्पलाईन कॉल सेंटरच्या 020-39331199 या तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या क्रमांकावरही माहिती मिळणार आहे.  

सारथीद्वारे मतदारांना आज सकाळी सातपासून ते मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत माहिती मिळणार आहे. तर हेल्प डेस्कद्वारे मंगळवारी संध्याकाळी  साडेपाच वाजेपर्यंत माहिती मिळणार आहे. 

तसेच महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर निवडणूक या सदराखाली Voter Search या लिंकवर मतदारांना त्यांचे मतदानाचे केंद्राबाबतची माहिती उपलब्ध केली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या  वोटरसर्च या मोबाईल अॅपवरही मतदारांना  त्यांची नावे शोधता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.