दिघी-बोपखेल प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत लक्ष्मण इंगळे (अ), बाळू गंगाराम लांडे (ब), वृषाली समीर झपके-घुले (क), कल्पना चंद्रकांत वाळके (ड) यांनी आज (रविवारी) प्रभागात प्रचार फेरी काढली. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. 

दिघी गावठाणातून प्रचारफेरीला सुरुवात झाली. मारुती मंदिर, साई पार्क, यमाईनगर, गोकूळ कॉलनी, ममता स्वीट होम, शिवनगरी, आदर्शनगर, भारत मातानगर, गजानन महाराजनगर, गायकवाडनगर, रोनवाल पार्क, चौधरी पार्क, विजयनगर मार्गे प्रचारफेरीला काढण्यात आली. गावठाणात प्रचाराची सांगता सभा झाली.

 

विरोधकांकडून मतदारांना पैशाची पाकिटे पाठवली जात आहेत. ज्यांनी देवाला आणि गावाला फसवले आहे, ते सर्वसामान्य नागरिकांना काय सोडणार आहेत. मतदारांनी त्यांच्या आमिषाला बळी न पडता त्यांची जागा दाखवून देण्याचे, आवाहन नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी केले. 

प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये कुंडलिक सैदाणे, हरि लबडे, मुन्ना सहा, डॉ. महेश भारती, बाबू शिंदे, सुधाकर भोसले, सुरेखा परांडे, माया वाळके, राजश्री गोडसे, प्रतिभा गवळी, चंदा वाळके, वृषाली पाटील, सतिश वाळके, आण्णा गायकवाड, राजू कदम, सुहास गरूड, सुमन मुळे, अनिता इंजे, वासुदेव अवसरमन यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.