प्रभाग क्र. 26 मध्ये भाजपचा रोड शो हाऊस फुल!

एमपीसी न्यूज –  प्रभाग क्र. 26 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य रोड शोचे आयोजन शुक्रवारी (दि.17) सायंकाळी करण्यात आले. तीन हजार भगवे फेटेधारी महिला, तरुण व अबालवृद्धांचा जनसागर या रोड शोमध्ये लोटला.  रोड शो दरम्यान उमेदवारांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या मतदारांचे उमेदवारांनी हात उंचावून अभिवादन केले. 

या प्रभागातील भाजप उमेदवार ममता गायकवाड, आरती चोंधे, तुषार कामठे व संदीप कस्पटे यांच्या  मतदारसंघातील प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून वाड्यावस्त्यांसह विविध कॉलन्या व उच्चभ्रू सोसायटीतील मतदारांपर्यंत ते पोहोचले आहेत. वाकड-पिंपळे निलख विशाल नगरचा बहुतांश मतदार हा नोकरी व्यावसायनिमित्त दिवसभर बाहेर असतो. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यातच या परिसरातील आयटीयन्सचे मोठे जाळे आहे. शनिवारी सुट्टीचा दिवस गाठून तब्बल सहा तास हा रोड शो करण्यात आला.

पिंपळे निलख गावठाण, विशालनगरमधील सर्व सोसायट्या रहिवाशी भागात हा रोड शो झाला. भगवा फेटा परिधान केलेल्या सुमारे अडिज हजार महिला या रोड शो चे आकर्षण ठरल्या प्रत्येक वाडी वस्तीवर रॅलीचे व उमेदवारांचे स्वागत व औक्षण करीत फटाक्यांची आतिषबाजी झाली, हातात पंचारती घेऊन रॅलीच्या स्वागतासाठी रस्त्यावर आलेल्या महिलांनी उमेदवारांना ओवाळण्यासाठी एकच गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात व वाजत्र्यांच्या निनादात निघालेल्या या रोड शो मध्ये हातात भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. 

सोसायटीतील उच्चशिक्षित व नोकरदारवर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी या भव्य रोड शोमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान, वाहतुकीला अडथळा होऊ नये, नागरिकांना कसला त्रास होऊ नये शिस्तप्रिय संचलनसाठी  प्रणय कामठे, बाळासाहेब कामठे, निखिल मदने, राहुल पठारे, हेमंत चव्हाण, अजय कस्पटे, विशाल मानकर, योगेश कस्पटे, नितीन पाटील, महेश शेळके, उदय माने, विकी कदम, श्री दुर्गे, अमोल कामठे, संगमेश इंगवले, निरंजन दळवी, आदित्य इंगवले, सफल कर्नावत आदींनी तगडे नियोजन केले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.