इन्फोसिस, टीसीएस संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश!

‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – व्हाईट कॉपर आयोजित ‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस आणि टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये रवी थापलीयाल याने केलेल्या महत्वपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने सिमन्स् संघाचा 7 गडी राखून पराभव केला. सिमन्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली पण हा निर्णय त्यांना महागात पडला. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव बहरला नाही. त्यांनी 20 षटकात 9 गडी बाद 111 धावा केल्या. संदीप कानिटकर (25) व श्रीनाथ सन्थनाम (32) यांनी पाचव्या गड्यासाठी 51 चेंडूत 54 धावांची भागिदारी करून संघाचा डाव सावरला. इन्फोसिस संघाने हे आव्हान 10.2 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. संजय पुरोहित (31) याने चांगल्या सलामी दिल्यानंतर प्रभज्योत मल्होत्रा (30) व वैभव महाडीक (34) यांनी दुसर्‍या गड्यासाठी 37 चेंडूत 71 धावांची भागिदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. 

दुसर्‍या सामन्यामध्ये टीसीएस संघाने सनगार्ड-एफआयएस संघाचा 28 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. टीसीएस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 203 धावांचे आव्हान उभे केले. मयांक जसोरे (58), गौरव सिंग (47) व विक्रमजीत सिंग (68) यांनी संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. पहिल्या गड्यासाठी मयांक आणि गौरव यांनी 56 चेंडूत 83 धावा केल्या. दुसर्‍या गड्यासाठी गौरव आणि विक्रमजीत यांनी 35 चेंडूत 50 धावा केल्या. सनगार्ड-एफआयएस संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 20 षटकात 5 गडी बाद 175 धावांवर संपुष्टात आला. प्रशांत पोळ (52) व विक्रांत बांगर (44) यांनी 67 चेंडूत 94 धावांची भागिदारी करून चांगली सलामी दिली. पण त्यानंतर ते आव्हान राखू शकले नाही. 

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्यपूर्व फेरीः 1) सिमन्स्ः 20 षटकात  9 गडी बाद 111 धावा (संदीप कानिटकर 25 (31, 2 चौकार), श्रीनाथ सन्थनाम 32 (28, 1 चौकार), रवी थापलीयाल 2-21, संदीप यादव 2-10) ; (भागिदारी-पाचव्या गड्यासाठी संदीप आणि श्रीनाथ यांच्यामध्ये 54 (51 चेंडू) पराभूत वि. इन्फोसिसः 10.2 षटकात 3 गडी बाद 115 धावा (संजय पुरोहित 31 (13, 7 चौकार), प्रभज्योत मल्होत्रा 30 (14, 1 चौकार, 3 षटकार), वैभव महाडीक 34 (28, 6 चौकार); (भागिदारी- दुसर्‍या गड्यासाठी प्रभज्योत आणि वैभव यांच्यामध्ये 71 (37 चेंडू); सामनावीर- रवी थापलीयाल;

2) टीसीएसः 20 षटकात 4 गडी बाद 203 धावा (मयांक जसोरे 58 (36, 10 चौकार), गौरव सिंग 47 (38, 4 चौकार, 2 षटकार), विक्रमजीत सिंग 68 (35, 6 चौकार, 4 षटकार); (भागिदारी-पहिल्या गड्यासाठी मयांक आणि गौरव 83 (56 धावा); दुसर्‍या गड्यासाठी गौरव आणि विक्रमजीत यांच्यामध्ये 50 (35) वि.वि. सनगार्ड-एफआयएसः 20 षटकात 5 गडी बाद 175 धावा (प्रशांत पोळ 52 (37, 8 चौकार, 1 षटकार), विक्रांत बांगर 44 (36, 5 चौकार, 1 षटकार), रॉबिन जोशी 20, पवन आनंद 21, गौरव सिंग 2-20) ; (भागिदारी-पहिल्या गड्यासाठी प्रशांत आणि विक्रांत 94 (67); सामनावीर- गौरव सिंग;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.