वाकडमध्ये भाजप नगरसेवकाच्या पुत्रांवर गुन्हा

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक थोपटे यांच्या कामगारांना मारहाण 

 

एमपीसी न्यूज – राजकीय वैमनस्यातून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या मुलाने आपल्या साथीदारांसह  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या हॉटेलमधील स्वयंपाक्याला सिमेंटच्या गठ्ठुने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास रहाटणी येथे घडली. याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलासाह 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम चंद्रकांत नखाते, शशिकांत नखाते, स्वप्निल नखाते, सुभाष नखाते, मोरेश्वर नारायण नखाते, विजय कडू, सागर झांबरे, दिपक पवार, दाद्या माने, नवनाथ पवार, सुनिल दळवी, आकाश प्रल्हाद नखाते, प्रविण नखाते, प्रविण शेंडगे, अमित भुरुक, प्रविण सोंडकर, ऋषीकेश चव्हाण, बाळा गोडगिरे, अभिजीत भालके, विनोद नखाते, अमोल शंकर नखाते, प्रविण झांजे, अविनाथ नखाते (सर्व रा, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अण्णासाहेब कुरुळे (वय 29, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभम नखाते हा भाजपचे नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा मुलगा आहे. भाजपचे चंद्रकांत नखाते आणि राष्ट्रवादीचे कैलास थोपटे यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. चंद्रकांत नखाते हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनतर त्यांच्या मुलाने आपल्या साथीदारांसह दुचाकी रॅली काढली.

कैलास थोपटे यांचे रहाटणीत कुणाल या नावाने हॉटेल आहे. रॅली हॉटेलसमोरुन जाता असताना थोपटे यांच्या हॉटेलमधील स्वयंपाकी विष्णु बोलके हे हॉटेलचे गेट बंद करत होते. त्यावेळी शुभम चंद्रकांत नखाते आणि स्वप्निल नखाते यांनी बोलके यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादी कुरुळे सोडविण्यासाठी मध्ये गेले असता आरोपी शुभम आणि त्याच्या साथीदारांनी त्यांनाही लाथा-बुक्यांनी आणि सिमेंटच्या गठ्ठूने बेदम मारहाण केली. यामध्ये कुरुळे यांच्या डाव्या मांडीला जबर मार लागला आहे. वाकड ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. धुमाळ तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.