टीसीएस, तिकोना डिजिटल संघांची आगेकूच

चौथी रिग्रीन टी-20 कॉर्पोरेट करंडक क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – चौथ्या रिग्रीन टी-20 कॉर्पोरेट करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत टीसीएस संघाने पुणे क्रिकेट अकादमी संघाचा व तिकोना डिजिटल संघाने डॉईस्‌ बॅक संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

एमसीजी मैदान, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सौम्य मोहंतीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीसीएस संघाने पुणे क्रिकेट अकादमी संघांचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पवन मिरचंदानीच्या नाबाद 31 व कुणाल झांबरच्या 23 धावांच्या जोरावर पुणे क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 6 बाद 122 धावा केल्या. सिद्धार्थ मुखर याने 17 धावांत 4 गडी बाद केले. 122 धावांचे लक्ष टीसीएस संघाने केवळ 18.5 षटकात 5 बाद 123 धावांसह पूर्ण केले. विक्रमजीत सिंगने 38 धावा करून सौम्य मोहंतीला सुरेख साथ दिली. सौम्य मोहंती सामनावीर ठरला.

दुस-या सामन्यात हॅरी सावंतच्या जलद 73 धावांच्या जोरावर तिकोना डिजिटल संघाने डॉईस्‌ बॅक संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना डॉईस्‌ बॅक संघाने 20 षटकात 9 बाद 129 धावा केल्या. यात गौरव एस याने 34, नरेंद्र कोस्टाने 27 व विवेक जे याने 29 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.129 धावांचे लक्ष तिकोना डिजिटल संघाने केवळ 17.2 षटकात 2 बाद 130 धावांसह सहज पूर्ण केले. राहूल देशमुखने नाबाद 38 धावा करून हॅरी सावंतला सुरेख साथ दिली. हॅरी सावंत सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पुणे क्रिकेट अकादमीः 20 षटकात 6 बाद 122 धावा (पवन मिरचंदानी नाबाद 31, कुणाल झांबर 23, चिन्मय जोशी नाबाद 16, साहिल पारख 18, सिद्धार्थ मुखरया 4-17, रूतुपर्ण भावे 1-15, राहूल गर्ग 1-17) पराभूत वि टीसीएसः 18.5 षटकात 5 बाद 123 धावा (सौम्य मोहंती नाबाद 50, विक्रमजीत सिंग 38, सलिम 13, विवेक बाज 2-12, सागर ढवळे 1-29, कुणाल झांबर 1-25) सामनावीर- सौम्य मोहंती

टीसीएस संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.